स्वच्छ व सुंदर 'गेवराई' करीता परखड 'समिती' स्थापनेची गरज गेवराई, दि. ११ [ प्रतिनिधी ] (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहर ...
स्वच्छ व सुंदर 'गेवराई' करीता परखड 'समिती' स्थापनेची गरज
गेवराई, दि. ११ [ प्रतिनिधी ]
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहर व परिसरात विकासाच्या नावाखाली 'प्रशासनाकडून' मोठ्या प्रमाणावर निधीचा वापर करण्यात येतो, मात्र त्याचा वापर 'मर्जीतील' लोकांना पोसण्यासाठी होऊ लागल्याचे अलीकडच्या काळात पाहवयास मिळतो. परिणामी विकास नव्हे तर भकासाकडे वाटचाल सुरू झाली असल्याने यावर अंकुश ठेवण्यासाठी व स्वच्छ व सुंदर 'गेवराई' करीता परखड 'समिती' स्थापनेची गरज असल्याचा अभिप्राय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष तथा ज्येष्ट पत्रकार सुभाष मुळे यांनी व्यक्त केला.
गेवराई शहरात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर निधीचा वापर करून विकासाची कामे झाली. लोकप्रतिनिधींनी देखिल शासनाकडून नीधी खेचून आणला. या निधीतून सर्वच पारदर्शक कामे झाली असेही म्हणता येणार नाही. तळे राखेल तो पाणी पिणारच.. यात वेगळपण सांगण्याची गरज नाही, परंतु पिणारा आणि खाणारा किती खातो व पितोय याकडे आता अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. मर्जीतील लोकांना हाताशी धरून व त्यांना देऊ केलेले कामे मर्जीतील संस्थेचे नाव पुढे करून होतात. बहुतांश कामे पुढारी यांचीच असतात, तेच खर्च करतात.. तेच कमाई करतात.. ही त्यांची दुकाने आहेत, परंतु हा पैसा शासनाच्या तिजोरीतून म्हणजेच जनतेच्या खिशातून होतोय याचे भान व्हायला हवे. ही बाब लक्षात घेऊन सकारात्मक कार्यासाठी 'परखड' समविचारी मंडळींनी एकत्रितरित्या येऊन स्वच्छ व सुंदर 'गेवराई' करीता 'समिती' स्थापनेची गरज निर्माण झाली आहे असं सांगताना सुभाष मुळे पुढे म्हणाले की, करावयाची कामे, आलेला निधी व पारदर्शकता याबाबी हाताळताना अधिकारी व संबंधितांवर लक्ष वेधून 'दक्षतेने' कामे झाली पाहिजे. याकरिता पत्रकार, सामाजिक संघटना पदाधिकारी, विधिज्ञ या स्तरातील परखड व्यक्तींनी समिती गठीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपली गेवराई, सुंदर व स्वच्छ गेवराई, यासाठी सकारात्मक विचार पुढे करून पाऊले उचलली तर अशक्य काहीच नाही, दरम्यान याबाबत सुभाष मुळे व त्यांच्या सहकारी व्यक्त झाले असून शहरातील राजकारण वीरहीत बहुतांश नागरिक या विषयावर आणि विचारावर सहमत असुन लवकरच चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.
No comments