दिव्यांगाचा 5% निधी वाटप करण्यात यावा आलेगाव ग्रामपंचायतीला प्रहार अपंग क्रांती संघटनेचे निवेदनाद्वारे मागणी 15 दिवसात निधी वाटप न झाल्यास...
दिव्यांगाचा 5% निधी वाटप करण्यात यावा आलेगाव ग्रामपंचायतीला प्रहार अपंग क्रांती संघटनेचे निवेदनाद्वारे मागणी
15 दिवसात निधी वाटप न झाल्यास ग्रामपंचायतला टाळे ठोकू...जिल्हा उपाध्यक्ष गणेश लहामगे
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पातूर:- आलेगावं ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 4 वर्षांपासून दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित आहे यासंदर्भात मागील 4 वर्षाचा नीधी गेला कुठे यांची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करुन 4 वर्षासहीत लाभार्थ्यांना येत्या 15 दिवसात निधी उपलब्ध करून वितरित करण्यात यावे अन्यथा आलेगावं ग्रामपंचायत ला कुलूप लावून आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे ग्रामसेवक तायडे,सरपंच गोपाल पाटील यांना निवेदन देण्यात आले.सदर दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीची तरतूद सरकारने केली असून ग्रामपंचायतीने हा निधी वित्त आयोग च्या आराखड्यात मंजूर केला असेल तर त्या निधीतून उपलब्ध करून लाभार्थ्यांना वितरित केला जातो किंवा ग्रामपंचायत च्या सामान्य फंडातून हा निधी उपलब्ध करुन लाभ दिला जातो किंवा ग्रामपंचायत या बाबत ठरविते, दरवर्षी हा पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्ती ला वितरित करणे बंधनकारक आहे परंतु मागील चार वर्षांपासून या निधीचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालाच नाही तेव्हा सदर ग्रामपंचायतीच्या हा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रमेश लहामगे प्रहार आणि अनिल भवाने सदानंद गिल्ले सय्यद युनूस अर्चनाबाई काठोळे मोहन बंड जगन भाऊ येनकर इस्माईल भाई हिवराळे राजू चौरे मथुराबाई तेलगोटे दिव्यांग प्रहारसेवक सोबत सामाजिक कार्यकर्ता निलेश कापकर. यांनी दिव्यांग बांधवांना सोबत घेत ग्रामसेवक,सरपंच,ग्राम पंचायत सदस्य रविभाऊ मुर्तडकर, गणेश धाईत, संजय गावंडे, पुरुषोत्तम आवटे,इरफान भाई यांना निवेदन देण्यात आले.

No comments