शिंदे गटाच्या आमदारावर हल्ला..अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२८):-अहिल्या...
शिंदे गटाच्या आमदारावर हल्ला..अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८):-अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे संगमनेर फेस्टिव्हल आयोजित १७ व्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये संगमनेरचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला केला.मात्र त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांनी आणि इतर नागरिकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या घटनेमुळे मात्र शहरात चांगलीच खळबळ उडाली.संगमनेर फेस्टिवल मध्ये राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर आमदार खताळ यांचे भाषण झाले. भाषण संपल्यानंतर आमदार अमोल खताळ निघाल्यानंतर एका माथेफिरुणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता तिथे असलेल्या नागरिकांनी हल्ला करणाऱ्याला चांगलाच चोप दिला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरभर पसरली असून नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

No comments