adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर येथून ठाणे जिल्ह्यात बदली होऊन गेलेले ए.पी.आय.शितल कुमार नाईक यांची कौतुकास्पद कामगिरी

 रावेर येथून ठाणे जिल्ह्यात बदली होऊन गेलेले ए.पी.आय.शितल कुमार नाईक यांची कौतुकास्पद कामगिरी  रावेर प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 रावेर येथून ठाणे जिल्ह्यात बदली होऊन गेलेले ए.पी.आय.शितल कुमार नाईक यांची कौतुकास्पद कामगिरी 



रावेर प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर येथुन बदली होऊन ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलिस स्टेशन येथे झाली असता. टोकावडे पोलिस स्टेशन हद्दीतील काळू धबधबा हा बघण्यासाठी देशभारतून अनेक राज्यातील नागरिक येत असतात. पावसाळ्याचे दिवस चालू असून धबधब्याचे सुंदर दृश्य बघायला पर्यटक खुप मोठ्या संख्येने उपस्थित असतात.परंतु शनिवार दिनांक 22/07/2025 रोजी सायंकाळी 10 वाजेच्या सुमारास देशातील विविध क्षेत्रातून शेकडो पर्यटक काळू नदी ओलांडून धबधबा बघायला गेले असता.अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जवळ पास 250 विविध राज्यातून आलेली पर्यटक यांना परतीचा प्रवास करणे. खुप अडचणींचे झाले. पर्यटक नदीच्या वाढत्या प्रवाहात अडकले असल्यामुळे पर्यटकांची तारांबळ उडाली असता. वेळीच एक पर्यटकाने टोकावडे पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली असता ए.पी.आय शितल कुमार नाईक साहेब यांनी तत्परता दाखवत फॉरेस्ट अधिकारी यांना माहिती दिली व स्थानिक गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळाली असता घटना स्थळी पोहचून नदीचा प्रवाहाचा वेग पाहून नदी मध्ये दोरखंड टाकून सुमारे 8 तासाचे रेस्क्यू ऑपरेशन करून 250 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असता पर्यटकांनी ए.पी. आय शितल कुमार नाईक याचे आभार मानले.

      जळगांव जिह्यातील रावेर पोलिस स्टेशन येथे सेवा बजावत असतात असे अनेक प्रकारच्या मोठया कामगिरी करून आपल्या नावाचा ठसा रावेर मध्ये उमटवला त्या प्रकारे आपला ठसा मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस स्टेशन येथे आपली कार्यकर्तृत्व ने छाप सोडत आहेत. त्यांच्या या कामगिरी बद्दल रावेर तालुक्यामध्ये आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम चे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा उपाध्यक्ष नगीनदास इंगळे सर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते राहुल गाढे, उपाध्यक्ष संतोष कोसदे ,महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेंद्र अटकाळे, जिल्हा संघटक कांतीलाल गाढे, तालुका सरचिटणीस प्रशांत गाढे, कामगार नेते दिलीप कांबळे, माजी नगराध्यक्ष हरी शेठ गनवाणी, एड. योगेश गजरे, प्रशांत सवरने, धुमा तायडे, सावन मेढे माजी.प.स.सदस्य कैलास पारधी इत्यादींनी ए.पी.आय.शितल कुमार नाईक  यांच्या वर अभिनंदनचा वर्षाव केला

No comments