सातारा जिल्ह्यातील चार पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या:- आठ एपीआय अधिकारी पदोन्नतीने होणार पीआय ..!! संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्र...
सातारा जिल्ह्यातील चार पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या:- आठ एपीआय अधिकारी पदोन्नतीने होणार पीआय ..!!
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलातील चार पोलीस उपधीक्षकांच्या ( डीवायएसपी ) दर्जेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कराड,फलटण,वडूज दहिवडी,कोरेगांव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच बरोबर जिल्ह्यातील आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळून त्यांचा पोलीस निरीक्षक बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. डीवायएसपी राज्यश्री पाटील सांगली तुरुची प्रशिक्षण केंद्र येथून कराड येथे बदली झाली आहे. डीवायएसपी विशाल खांबे यांची जालना येथून फलटण येथे बदली झाली आहे. कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. डीवायएसपी सोनाली कदम यांची सांगली तुरुची प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे. दहिवडीच्या डीवायएसपी डॉ. अश्विनी शेडगे यांची गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे ते बदली झाली आहे. तर फलटणचे डीवाय एसपी राहुल धस यांची नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. दरम्यान सातारा पोलीस दलातील सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ( एपीआय ) दर्जेच्या आठ जणांना पदोन्नती मिळणार आहे. यामध्ये राज्यांतील 361 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती मिळून ते काही दिवसांत पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

No comments