"मा.गुलाबराव पाटील फाउंडेशन"व शिवसेना यांच्या सौजन्याने गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप.. विकास पाटील धरणगाव (संपा...
"मा.गुलाबराव पाटील फाउंडेशन"व शिवसेना यांच्या सौजन्याने गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप..
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव तालुक्यातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त " मा.गुलाबराव पाटील फाउंडेशन"व शिवसेना यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा तिन हजार मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. व शिवसेनेचे माजी गटनेते विनय उपाख्य पप्पु भावे यांच्या वतीने दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांना 200 पादत्राणे देऊ केलेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक व जीपीएस फाउंडेशन वर्षभर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य,दिव्यांगासाठी तीन चाकी सायकल,तीर्थयात्रेला जाणार्यासाठी प्रवासाची सोय,मुलींसाठी सायकली,भजन, कीर्तन मंडळींसाठी टाळ, मृदुग व संगीत साहित्य विद्यार्थ्यांना मोफत वह्या असा उपक्रम वर्षभर राबवत असतात.
सदर कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पाटील विराजमान होत्या तर
"मा.गुलाबराव पाटील फाउंडेशन चे अध्यक्ष जि. प.सदस्य, युवा नेते प्रतापराव पाटील, इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव व आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष सी.के.पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे,मा.गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष विजय महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे नेते भानुदास विसावे,युवा नेते शहर प्रमुख विलास महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच सर्व शिवसेना परिवारातील कार्यकर्ते पदाधिकारी, वाल्मिक पाटील, बूटा पाटील, तौसीक पटेल,अहमद पठाण,रविंद्र जाधव, नानभाऊ घामोळे,सद्दाम भाई,गोविंद मनोरे, वासुदेव चौधरी, भैया महाजन, किरण महाजन, संतोष महाजन, , संजय चौधरी, ,सुदर्शन भागवत, संजय पवार,धीरेन्द्र पुरभे,बाळासाहेब जाधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक ए. एस.पाटील यांनी केले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी आपले मनोगतातून फाउंडेशनचा मानस व्यक्त केला व यावर्षी दिड लाख वह्या वाटपाचे उद्दिष्टे असल्याचे सांगितले.आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी आभारपर मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सुरेखा पाटील यांनी दातृत्वाबद्दल मा. गुलाबराव पाटील फाउंडेशन
व शिवसेना परिवाराचे आभार व्यक्त केलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक किरण चव्हाण यांनी केले तर आभार आदर्श विद्यालयाचे उपशिक्षक बाबाजी मासुळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी मेहनत घेतली

No comments