डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सी बी एस ई स्कूल सावदा येथे भव्य रक्तदान शिबिर रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी /इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:...
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सी बी एस ई स्कूल सावदा येथे भव्य रक्तदान शिबिर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी /इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सी बी एस ई स्कूल सावदा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती महाजन यांनी केले आणि या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या डॉ.राशी अग्रवाल , डॉ. आर्या नाईक, लक्ष्मण पाटील ( पी आर ओ ) ,राज तन्वर ,यश वाघ, वृषाली जोगे, हिमानी नवले या टीमने रक्त दात्यांची योग्य काळजी व त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची दखल घेत जबाबदारी पार पाडली ,आमच्या शाळेतून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली व ज्या रुग्णांना रक्ताची गरज असेल त्याला रक्त वेळेवर पोहचेल व त्याचे स्वस्थ अबाधित राहील .या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments