adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, जालना जिल्हाधिकारी म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिले...!!

 डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, जालना जिल्हाधिकारी म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिले...!!   सौ. कलावती ग...

 डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, जालना जिल्हाधिकारी म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिले...!! 


 सौ. कलावती गवळी ( ठाणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 ठाणे जिल्ह्याला नेहमीच प्रशासकीय अधिकारी हे पसंती आणि मर्जीतील अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या होत. असल्याचे चांगलेच पाहायला मिळतेय... ठाणे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. तर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे हे सेवेतून निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी जालना जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे 2016 च्या तुकडीतील (आयएएस अधिकारी ) आहेत. मुळचे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे असलेले पांचाळ हे एमबीबीएस पदवीधर आहेत.   राज्य शासनांने बुधवारी सायंकाळी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असुन. यामध्ये जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचाही समावेश होता. त्यांची बदली ठाणे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 2023 मध्ये जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. गत दोन व अडीच वर्षात त्यांनी रेशीम शेती वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याशिवाय बालविवाह मुक्त अशी सस्ती अदालत यासारखे उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत नदी पात्राची स्वच्छता मोहीम व इतर उपक्रम मातही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ सहभाग  ठरला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बुधवारी डॉ. पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या बदली आदेशामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदभार तात्काळ घ्यावा असं नमूद केलं होतं. त्यामुळे जालना जिल्हाधिकारी पदभार हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून सेवानिवृत्त जिल्हाधिकारी  अशोक शिंनगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे .

No comments