साकळीत कानबाईच्या उत्सवानिमित्त डॉ.मकरंद नेवे यांचेकडे किल्ल्याची आकर्षक सजावट सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- ...
साकळीत कानबाईच्या उत्सवानिमित्त डॉ.मकरंद नेवे यांचेकडे किल्ल्याची आकर्षक सजावट
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १२ बारा गडकिल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.ही अतिशय हि सबंध हिंदू समाजासाठी अभिमानाची बाब आहे.या गोष्टीची प्रेरणा घेऊन तालुक्यातील साकळी येथील डॉ.मकरंद सुभाष नेवे यांचे कडे कानबाईच्या उत्सवानिमित्त आगळीवेगळी सजावट म्हणून किल्ल्याचीहुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे.ही किल्ल्याची प्रतिकृती कागदी पुठ्यापासून साकारण्यात आलेली असून त्यावर आकर्षक रंगकाम केलेले आहे.यामध्ये किल्ल्याचा दरवाजा,बुरुज व इतर किल्ल्यांच्या बाबतच्या सर्वच बाबी नक्षीदारपणे व कल्पकतेने साकारण्यात आलेले आहे.तसेच सुंदर असे प्रकाश संयोजन करण्यात आलेले आहे.त्यामुळे या किल्ल्याची सजावट अतिशय पाहता क्षणी मनाला आनंद देऊन जाते.या सजावटीसाठी डॉ.मकरंद नेवे यांच्या पत्नी सौ.मानसी नेवे,भाऊ,मुले यांच्यासह सर्व कुटुंबांने परिश्रम घेतले.

No comments