adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनुकंपा भरतीबाबत राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह केंद्र शासनाकडूनही अनुकंपा भरतीसाठी अशी सकारात्मक पावले उचलली जावीत

 अनुकंपा भरतीबाबत राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह केंद्र शासनाकडूनही अनुकंपा भरतीसाठी अशी सकारात्मक पावले उचलली जावीत   श्रीरामपूर / प्रतिनि...

 अनुकंपा भरतीबाबत राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह

केंद्र शासनाकडूनही अनुकंपा भरतीसाठी अशी सकारात्मक पावले उचलली जावीत  

श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणाऱ्या १५० दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्त्वावर १००% भरतीत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय १ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने  पदांसाठी शिफारस केलेले उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय अत्यंत वाखाण्याजोगा असून अशा कठीण प्रसंगी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तो दिलासा ठरतो, राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असताना केंद्र शासनाने देखील त्यांच्या अखत्यारित  येणाऱ्या विविध खात्यामध्ये देखील अनुकंपा भरतीची अंमलबजावणी तत्काळ करावी अशी अपेक्षा कर्मचारी व त्यांच्या संघटना कडून व्यक्त केली जात आहे. आजही केंद्र शासनाच्या अनेक खात्यांमध्ये अनुकंपा नियुक्ती प्रलंबित असून त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, शासनातील सेवकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय केंद्रासाठीही दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचे येथील परिवर्तन फाऊंडेशन आणी माजी सैनिक संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

वृत्त विशेष सहयोग

मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments