अत्याचारातून एक अल्पवयीन मुलगी गर्भवती याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील एका वसतिगृह...
अत्याचारातून एक अल्पवयीन मुलगी गर्भवती याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील एका वसतिगृहात राहणाऱ्या शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सन 2023 पासून लैंगिक अत्याचार केला गेला. सदर पीडित मुलीचे पोटात दुखत असल्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी गेली असता ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर सदर अल्पवयीन पीडितेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलीस स्थानकात दिली. सदर गुन्ह्यातील आरोपीस चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे इयत्ता बारावी वर्गात शिकत आहे. त्या अल्पवयीन मुलीवर अविनाश वेस्ता पावरा या इसमाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. यामधून सदर अल्पवयीन मुलगी हि गरोदर असल्याचे समजताच तिने चोपडा शहर पोलीस स्थानकात अतिप्रसंग झाल्याची फिर्याद दिली आहे. यानुसार अविनाश वेस्ता पावरा रा. अंमलवाडी पो. उमर्टी ता. चोपडा जि. जळगाव याचेविरुद्ध चोपड़ा शहर पो.स्टे. सी.सी.टी.एन.एस. गु.र.नं. 502/ 2025 भा.न्या.से. कलम 64, 65 (1) सह बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम सन 2012 चे कलम 4, 5 (1) (2), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशीं हे करीत आहेत.

No comments