एरंडोल येथे शांतता समितीची बैठक संपन्न. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल येथील नगर पालिकेच्या सभागृहात ...
एरंडोल येथे शांतता समितीची बैठक संपन्न.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल येथील नगर पालिकेच्या सभागृहात गणेशोत्सव आणि ईद मिलाद व येणाऱ्या इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीचे सदस्य व शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य व माजी नगराध्यक्ष देविदास महाजन होते.प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय महाजन,शिवसेना ज्येष्ठ नेते रमेश महाजन,धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शेख कासम,निवृत्त नायब तहसीलदार अरुण माळी,माजी नगरसेवक जगदिश ठाकुर,माजी नगरसेवक सुभाष मराठे,एजाज अहमद,परेश बिर्ला,मयुर महाजन,नगर पालिकेचे प्रशासन अधिकारी एस.आर. ठाकुर,डॉ.सुधीर काबरा,महावितरण कंपनीचे रामपाल गेडाम आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी येणाऱ्या गणेशोत्सवात शहरात १८ मंडळ नोंदणीकृत असुन त्यातील जवळपास १० मंडळांच्या गणेश मुर्त्या २० फूट व त्यापेक्षा मोठ्या व उंच असल्याचे सांगितले.यासाठी महावितरण कंपनीने व पोलिस प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या तसेच नगर पालिकेतर्फे शहरात नविन जलवाहिन्या टाकल्यामुळे नविन तयार करण्यात आलेले रस्ते खोदलेले असून सध्या सुरु असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजवावे जेणे करुन श्रींची मूर्तीस कुठलेही नुकसान होणार नाही असे सुचवण्यात आले.पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी गणेश उत्सव व ईद मिलाद हा सण उत्साहात साजरा करा परंतु कायद्याचे पालन करुन सदर सण व इतर सण साजरे करा असे आवाहन केले व गणेशोत्सवा दरम्यान व विसर्जन वेळी पोलिस विभाग नक्कीच भक्तांच्या सोबत असून त्यांनी देखील प्रशासनाला योग्य ते सहकार्य केल्यास शांततेत सर्व सण साजरे होतील अशी ग्वाही दिली.नगर पालिकेतर्फे गणेशोत्सवा दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून यात जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासन अधिकारी एस.आर. ठाकूर यांनी केले.याप्रसंगी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात सी.सी. टी व्हि.कॅमेरे बसवावे अशी मागणी केली.याप्रसंगी देविदास महाजन,शालिग्राम गायकवाड,जगदिश ठाकुर,विजय महाजन, रविंद्र महाजन,जावेद मुजावर,संजय चौधरी,परेश बिर्ला आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवालदार अनिल पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मोहन चव्हाण यांनी केले.याप्रसंगी पत्रकार,शांतता समितीची सदस्य,गणेश मंडळाचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

No comments