adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुणेकरांनों, गणेशोत्सव आनंदात साजरा करा पण नियम पाळा, गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज :- पोलीस आयुक्त अमितेशकुमार...!!

 पुणेकरांनों, गणेशोत्सव आनंदात साजरा करा पण नियम पाळा, गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज :-  पोलीस आयुक्त अमितेशकुमा...

 पुणेकरांनों, गणेशोत्सव आनंदात साजरा करा पण नियम पाळा, गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज :-  पोलीस आयुक्त अमितेशकुमार...!! 


सौ. संगीता इंनकर ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुणेकरांनो, गणेशोत्सव साजरा करताय तर आनंदात साजरा करा, पण पण प्रशासनाने निर्बंध दिलेल्या नियमांचे पालन करा आणि पोलीस प्रशासनालाही सहकार्य ठेवा असे आव्हानही पुणेकरांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गणेश उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केले आहे. गणेश उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पुणे पोलिसांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. उत्सव शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्वात गुन्हेगारांवर जामिनावर बाहेर आलेल्या आरोपी तसेच तडीपार गुन्हेगारांवर नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन्सच्या माध्यमांतून कडक कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरांत सी.सी.टीव्ही विशेष पथक नाकाबंदी व वाहतूक नियोजनाद्वारे कडक सुरक्षा उपाययोजना राबविली जाणार आहे. यंदाही गणेशोत्सवाला राज्य सरकारकडूंन महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरांतील महत्त्वांच्या गणेश मंडळांसोबत महत्त्वपूर्ण बैठका पार पाडल्या आहेत. शहरांत सुमारे 3,900 गणेश मंडळे असून या बैठकीला 400 ते 500 मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सव निर्बंध मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून. उत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पडावा यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांंसमवेत पुणे शहरांतील महत्वपूर्ण गणेश मंडळासमवेत तसेच वाहतूक विषयी नियोजनाबाबत आढावा घेतला आहे.

No comments