बस पलटी होऊन १ ठार ३५ ते ४० जखमी. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी एरंडोल:- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल कासोदा रस्त्यावर भडगाव कडून ए...
बस पलटी होऊन १ ठार ३५ ते ४० जखमी.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी एरंडोल:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल कासोदा रस्त्यावर भडगाव कडून एरंडोल येथे येणारी बस पलटी झाल्याने १ ठार तर ३५ ते ४०प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दिनांक एक ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अंजनी धरणा जवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या दर्ग्याजवळ दहा ते पंधरा फूट खोल असलेल्या नाल्यात पलटी झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल आगाराची बस क्रमांक MH20-BL3402 ही बस भडगाव वरून एरंडोल कडे यायला निघाली असता खडके खुर्द गावा वरून काही प्रवासी घेऊन ११.१५ वाजेच्या सुमारास नायरा पेट्रोल पंप जवळील दर्ग्याजवळ डाव्या बाजूला चालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण राहणार सावदे तालुका एरंडोल याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे डाव्या बाजूला वळणावर असलेल्या दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात उतरल्याने बस जागीच पलटी झाली व त्यातील गुलाब तुळशीराम माळी राहणार वडगाव बु. ता.भडगाव हे मयत झाले असून सुमारे ३५ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत यातील रोशनी प्रवीण पाटील भाग्यश्री पंकज पाटील उन्नती पाटील मयुरी पंडित पाटील मनीषा रुपेश पाटील सर्व राहणार खडके येथील विद्यार्थिनी तसेच मेहमूद कादर मन्यार, काफीया सलीम मण्यार,कल्पना राजेंद्र पाटील,शुभम राजेंद्र पाटील,सुभाष विठ्ठल पाटील,दिपाली दिलीप पाटील,अनिता समाधान पाटील,समाधान कैलास पाटील,उत्कर्ष समाधान पाटील,ऋषिकेश शरद पाटील,अनुसयाबाई बडगुजर,रत्नाबाई धनगर, सुनिता शंकर महाजन, वैशाली ज्ञानेश्वर मराठे, नौशाद बी,फरीदाबी जावीर कुरेशी, गोविंदा सोनवणे, निर्मलाबाई सोनवणे, शांताराम पाटील,लताबाई पाटील,वंदना महाजन, जिजाबाई जाधव,दग्गुबाई जाधव,सुरेखा पाटील, शोभाबाई चौधरी,कमलाबाई पाटील, बायजाबाई पाटील, अमोल पाटील,तुळजाभवानी पाटील यांचे सह अन्य प्रवासी जखमींना परिसरातील भारत चौधरी, संजय जमादार,वाल्मिक मराठे,कृष्णा ठाकरे ,शुभम पांडे तसेच प्रा.मनोज पाटील,अमित पाटील, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड,सहाय्यक फौजदार अनिल पाटील,विजय पाटील,कपिल पाटील,बापू पाटील, दिपक पाटील,सचिन पाटील, संदिप पाटील व सहकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे व गंभीर जखमींना तात्काळ जळगाव येथे जिल्हा व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी,डॉ.कैलास पाटील,योगिता बडगुजर,सचिन ठोंबरे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार केले.याप्रसंगी परिवहन महामंडळ एरंडोल आगाराचे निलेश बिचकुले यांनी भेट दिली.
दरम्यान एरंडोल पोलिस स्टेशनवरून मिळालेल्या माहितीनुसार बसचा चालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण याने हलगर्जी पणा करीत बस भरधाव वेगाने चालवत असल्याचे म्हटले आहे.तसेच बस चालक हा सुद्धा या वेळी जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.तर अपघातात जखमी गुलाब माळी यांना बसला क्रेनच्या सहाय्याने उचलून बसच्या खालून काढण्यात आले.एरंडोल पोलिस स्टेशनला उन्नती धानसिंग पाटील या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादी वरून बस चालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण यांचे वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील, संदीप पाटील,विजय पाटील, बापू पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील,करीत आहेत


No comments