श्री भुलेश्वर संस्थान व स्वामीसमर्थ केंद्र मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -...
श्री भुलेश्वर संस्थान व स्वामीसमर्थ केंद्र मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त श्री भुलेश्वर संस्थान व स्वामीसमर्थ केंद्र मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन २८ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान गजानन महाराज मंदीर गांधीचौक मलकापूर येथे करण्यात आले. या अंतर्गत गायत्री मंत्राचा ६ लाख व स्वामी समर्थांच्या १२ लाख जप शहरातील अनेक भक्तांकडून करण्यात येत आहे.
आदरणी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने व आशिर्वादाने गांधी चौक येथील गजानन महाराज मंदिराच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या पारायण हॉलमध्ये हा सोहळा २८ जुलैपासून सुरू असून ५ ऑगस्टपर्यंत शहरातील अनेक भक्तगण या पारायण सोहळ्यात व नाम जप सोहळ्यात भाग घेत असून भक्तीमय वातावरणात श्री भुलेश्वर संस्थान व श्री स्वामी समर्थ केंद्र मलकापूरच्या सेवेकर्यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत असून यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

No comments