adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जामनेर तालुक्यातील बेटावद येथील युवकाची निर्घृण हत्या; दोशींवर कठोर कार्यवाहीची मागणी

 जामनेर तालुक्यातील बेटावद येथील युवकाची निर्घृण हत्या; दोशींवर कठोर कार्यवाहीची मागणी  फैजपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर   इदू पिं...

 जामनेर तालुक्यातील बेटावद येथील युवकाची निर्घृण हत्या; दोशींवर कठोर कार्यवाहीची मागणी 

फैजपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बेटावद जामनेर येथील सुलेमान पठाण वय 21 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या या युवकाला बेदम मारहाण करत मारेकरांनी निर्घृण हत्या केली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात  गाजली असून आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी उपनगराध्यक्ष शे. कुर्बान आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीभा ताई पाटील  यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. दलित मुस्लिम आदिवासी एकता मंचच्या वतीने करण्यात आले 

फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील श्री गुरव यांना निवेदन शे.कुर्बान वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमिभा ताई पाटिल आदी उपस्थित पदाधिकारी

मोर्च्यात सुलेमान पठाण यांच्या मारेकरांना कठोर शासन व्हावे आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा. यासाठी आज फैजपूरला धडक मोर्चा घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते प्रांत अधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रांत अधिकारी कार्यालयातील गुरव साहेब यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकता मंचचे निवेदनातून खालील ठळक मागण्या केल्या आहेत या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आरोपींना दहा दिवसांच्या आत अटक करून न्यायालयात चारशीट दाखल करावी पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत व एकाला शासकीय नोकरी द्यावी मानवी हक्क आयोगाकडून स्वतंत्र चौकशी व्हावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा जिल्ह्यात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी सोशल मीडिया वरून भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल  करून कार्यवाही करावी समाजात असंतोष या घटनेने परिसरातील अल्पसंख्यांक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे वेळेत कारवाई न झाल्यास सामाजिक सलोखा धोक्यात येईल आणि भविष्यात अशा घटना वाढण्याची भीती आहे. यावेळी धडक मोर्चात माजी उपनगराध्यक्ष कलीम खान मणियार रियाज मेंबर रशीद तडवी फारुक शेख कौसर अली शौकत अली जहीर भाई यावल शे शकील माजी सहाय्यक फौजदार   अलीम भाई अख्तर पैलवान इरफान खान वसीम तडवी वाजिद खाटीक जफर अली सर्व पदाधिकारी आणि अनेक नामवंत उपस्थित होते महाराष्ट्रात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जाणार असल्याचेही यावेळी सांगितले गेले सरकारने न्याय कार्यवाही करण्यात दिरंगाई करणे आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यास कारण ठरेल.

No comments