adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात बुद्धिबळ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 खडसे महाविद्यालयात बुद्धिबळ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       मुक्ताईनगर:- ...

 खडसे महाविद्यालयात बुद्धिबळ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      मुक्ताईनगर:- श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रविवार रोजी ,महाविद्यालयात बुद्धिबळ खेळाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजावी ,यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम बुद्धिबळ खेळाची माहिती व नियम  माजी खेळाडू प्रशांत राणे यांनी दिली .यातून काही ठराविक खेळाडूंची निवड विशेष प्रशिक्षणासाठी करण्यात आली .कार्यशाळेसाठी विशेष उपस्थिती विजयेंद्र पाटील यांची होती .या प्रसंगी विजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "बुद्धिबळ खेळ हा केवळ खेळ नसून विचारशक्ती आणि रणनीतीची शाळा "आहे असे म्हटले .

प्रवीण राठोड, हर्ष जैन ,राहुल पावरा ,धनके पुष्पेंद्र ,किरण पावरा ,वैष्णवी मोरे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यापुढेही नियमित बुद्धिबळ या खेळाचा सराव क्रीडा विभागामार्फत घेण्यात येईल तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त यात सहभाग नोंदवावा असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले.    

      या कार्यशाळेचे आयोजन मा.प्राचार्य प्रो. डॉ.हेमंत महाजन ,उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे , उपप्राचार्य डॉ.वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले . 

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान सुरवाडे व आत्माराम मराठे यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी होण्यास सहकार्य  केले.

No comments