adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रासंगिक खानदेशातील कानबाई उत्सव

  प्रासंगिक   भरत कोळी यावल यांजकडून   खानदेशातील कानबाई  आपल्या भारत देशात अनेक पंथ अनेक जाती धर्म चालीरीती, भाषा अनेक परंतु भारत देश एक आह...

 प्रासंगिक  


भरत कोळी यावल यांजकडून 

 खानदेशातील कानबाई

 आपल्या भारत देशात अनेक पंथ अनेक जाती धर्म चालीरीती, भाषा अनेक परंतु भारत देश एक आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात खानदेशात म्हणजे आताचे तीन जिल्हे जळगाव धुळे नंदुरबार या खानदेशात श्रावण महिन्यात कानबाई चे रोट फार पुरातन काळापासून साजरे करीत आहोत याला असा खास पुरावा सादर करता येणार नाही पण काही माहितीच्या आधारावर आपणास माहिती सादर करीत आहे 

 कानबाई आपणाकडील प्रचलित नाव पण गुजरात मध्ये रवी रांदल म्हणून प्रचलित नावाने ओळखली जाणारी कानबाई ही सूर्य पत्नी म्हणून गुजरात मध्ये ओळखले जाते गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात दळवा या गावात रवी रांदल (सूर्य पत्नीचे )खूप मोठे भव्य दिव्य असे मंदिर आहे.

पूर्वी महाराष्ट्राचा खानदेश भाग  जंगल म्हणून ओळखला जाणारा भाग होता या ठिकाणी मानव वस्ती त्यावेळी नव्हती .

 हळू हळू या भागात मानवस्ती व्हायला लागली म्हणजे शेजारील प्रदेशातून म्हणजे गुजरात राजस्थान या ठिकाणाहून मानव या ठिकाणी वस्ती करून राहू लागले ते ज्या प्रदेशातून या खानदेशात आले त्या ठिकाणी ते करत असलेले उत्सव ते या खानदेशात करू लागले त्या उत्सवापैकी एक उत्सव म्हणजे कानबाई चे रोट 

 गुजरात मध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय निमित्त आलेले गुजराती मंडळी हा सण केव्हा साजरा करत तर त्यांना खूप आनंद व मनासारखे झाले उद्योग धंद्यात यश आले तेव्हा ते कोणतेही वेळी कानबाई चे रोट करत असत ते देवीचे दोन लोटे व त्यावर नारळ त्यावर मुखवटे व त्यावर परिस्थितीनुसार शृंगार चढवून सुशोभीत करीत असत तसेच 14कुमारी का किंवा 14 सुहासिनि चे   पूजन करतात व  देवीला खीर पोळीचा नैवेद्य देऊन संतुष्ट करतात.

 काही गुजराती मंडळी सहा आठ दहा  बारा मातीचे लोटे लावून देवीची पूजा अर्चा करून आनंद व्यक्त करतात.

 प्रांत बदल झाल्यामुळे हा सण आपल्या खानदेशात श्रावण महिन्यात म्हणजे नद्या नाल्यांना पूर आलेला असतो रिम झिम पाऊस पडत असतो सर्वत्र हिरवेगार दिसत असते पिके आनंदात डोलत असतात जनावरांना चारा भरपूर मिळतो सर्वदूर आनंदी वातावरण असते त्यामुळे शेतकरी मजूर वर्ग व्यापारी सर्व कसे अगदी आनंदी असतात अशावेळी नागपंचमी झाल्यावर पहिल्या रविवारी हा सण म्हणजे कानबाई चे रोट करतात. ह्या कानबाई देवी मुळे आपणास चांगला हंगाम येईल गाई म्हशी दूध देतील धान्य भरपूर पिकेल आपणास काही कमी पडणार नाही या भावनेतून उत्सव सुरू होतो त्याअगोदर नवीन लग्न झालेल्या सुना आपल्या घरी आणतात पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे किती रोट दळायचे ते आंघोळ करून शुद्ध भावनेने रोट पुरणपोळीचे असतात किंवा  जाड सरपोळी खीर असते 

 शुद्ध आचरणाने घरातील वडील माता धान्य दळून नवीन वस्त्र परिधान करून सकाळी चार वाजता उठून रोट तयार करून सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून पूजा प्रार्थना करून  मातेला  म्हणावे हे माते आम्हाला वर्षभर पुरेल एवढे धान्य आम्हाला सर्वांना दे निरोगी ठेव व आमची भरभराट होऊ दे या विचाराने पूजन करून दिवसभर आनंद व्यक्त करायचा रात्री देवीजवळ भजन वही  गायनाचा कार्यक्रम मुली तसेच परिसरातील स्त्रिया फुगडी इतर नृत्याचे प्रकार करून जागरण करतात सकाळी देवीची पूजा करून देवीला चौरंगावार बसवून डोक्यावर घेवून नदीवर वाजत गाजत नेऊन विसर्जन करतात सोबत वही गायक पुरुष व मंडळी असतात तर स्रीया गाणे म्हणून आनंदात कानबाईला प्रेमाचा निरोप देतात आणि सुखी आनंदी समृद्धीची अपेक्षा ठेवून आपल्या नेहमीच्या कामाला लागतात असा आहे खानदेशातील कानबाई चा महिमा. जय देवी कानबाई

No comments