जिल्ह्यात उत्कृष्ट सेवेबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव सरवर तडवी (तलाठी आप्पा) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन केल...
जिल्ह्यात उत्कृष्ट सेवेबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव
सरवर तडवी (तलाठी आप्पा) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित
प्रतिनिधी :- खलील आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथे १ ऑगस्ट२०२५ रोजी चोपडा तालुक्यातील( तलाठी सजा कार्यालय बिडगाव मोहरद) येथे कार्यरत असलेले तलाठी (आप्पा) श्री सरवर तडवी यांनी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच महसूल दिनाच्या औंचित्य साधून जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या एकूण ७३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गौरव ,सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, (राजू मामा भोळे) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार भेंडे यांच्या व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले

No comments