अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने बोल्हेगाव परिसरात डेंग्यू मुक्त अभियान संपन्न..मनपाच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा व योजना नागर...
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने बोल्हेगाव परिसरात डेंग्यू मुक्त अभियान संपन्न..मनपाच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा व योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहे आयुक्त यशवंत डांगे
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३):-महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये डेंगू मुक्त अभियान राबवले जात असून ८ आठवड्यामध्ये ८ हजार घरांची तपासून केली असून 21 हजार 800 पाणीसाठे नष्ट केली आहे यामध्ये 432 पाणी साठ्यामध्ये डेंगू सदृश्य अळ्या आढळल्या असून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करत फवारणी व नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा व योजना नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे काम यशस्वीपणे केल्यावरती आपले शहर डेंगूमुक्त होईल
असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने बोल्हेगाव परिसरात डेंगू मुक्त अभियान संपन्न झाले आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी केली यावेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रभाग अधिकारी निखिल फराटे, डॉ. अरुण पंढरकर, मिराबाई नरवडे, उमेश भोईटे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजुरकर, डॉक्टर दिलीप बागल, डॉक्टर शिल्पा चेलवा, डॉक्टर सृष्टी बनसोडे आदींसह प्रभागातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की बोल्हेगाव परिसरामध्ये नागरिक आता मोठ्या संख्येने वास्तव्य करत आहे त्यांना महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्यमान आरोग्य केंद्राची निर्मिती केली आयुक्त यशवंत डांगे यांनी खऱ्या अर्थाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत डेंगू मुक्त अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे विकासाच्या कामांबरोबर नागरिकांचे आरोग्य देखील चांगले राहावे यासाठी महापालिकेचा डेंगू मुक्त अभियानाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन डेंगू बाबत जनजागृती केली जाते, पावसाळ्याला सुरुवात झाली की साथीचे आजार सुरू होतात ते रोखण्याचे काम महापालिका करत आहेत असे ते म्हणाले,महापालिकेच्या माध्यमातून मागील वर्षापासून शहरात डेंगू मुक्त अभियान राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्यांच्या सहकार्यामुळे यावर्षी डेंगूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहे त्यामुळे आपण सुरू केलेल्या अभियानाला यश येत आहे असे मत आयुक्त यांनी व्यक्त केले.तसेच आयुक्त यशवंत डांगे यांनी मारुतीराव घुले पाटील महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा व राघवेंद्र स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा क्लास घेत विज्ञान व आरोग्य बाबत प्रश्न विचारत जनजागृती करण्याचे काम केले आहे यावेळी आशा सेविका यांनी पथनाट्याच्या माध्यमातून डेंगू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली


No comments