डोंगराळ भागात श्रावण सरीत बहरला निसर्गातील रानफुलांचा सुगंध. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पावसाळा ऋतूत निस...
डोंगराळ भागात श्रावण सरीत बहरला निसर्गातील रानफुलांचा सुगंध.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पावसाळा ऋतूत निसर्गाच्या सान्निध्यात अनेक बदल पाहायला मिळतात डोंगर दऱ्याखोऱ्यांत कडे कपारी खळखळून फेसाळून वाहणारे झरे पावसाळ्यातील हिरवीगार वनराई मुळे डोंगराळ भाग अधिक खुलून दिसत आहे.अशा निसर्गाच्या सान्निध्यात वेगवेगळ्या रंगांची रानफुलं फुलून सुगंध दरवळत बहरून गेलेली असतात.श्रावण महिन्यांपासून झाडाझुडुपांमध्ये रानोमाळ पठारावर अधूनमधून पावसाची उघडझाप, पिवळे ,तांबूस उन पडले असतांना ही धरणीमाई अंगावर हिरव्या रंगाची चादर पांघरून रानफुलांनी बहरून जंगलातील काटेरी झुडपातील, रानातील फुलं पाखरांना आकर्षित करते आहे.निसर्गाच्या सान्निध्यातील हे रोमहर्षक दृश्य दऱ्याखोऱ्यांत राबणाऱ्या कष्टकरी बळीराजाला व गुरं चारणाऱ्या गुराख्खाला प्रसंन्न व आल्हाददायक वातावरण निर्माण करायला भाग पाडते.अशावेळी धरणी मातेने आपल्या कुशीतून निसर्गातील लेकरांना वनफुलांचे भरभरून दाण पुरविले असते त्यातील वनफुल हे मन प्रसंन्न करणारे वरदाणच आहे.
१. रान टिवरा,तेरडा :- रान टिवरा हे जंगली गुलाबी रंगाचे फुलं काही ठिकाणी त्याला तेरडा म्हणतात.श्रावण महिन्यात डोंगराळ भागात माळरानावर बहरलेलं आढळते.ह्या रानफुलाचा सुगंध कमी असतो देठ स्रीच्या नथलीवानी वाकलेले असते ही फुलं साधारण ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रानात बहरून गेलेली असतात नंतर बीजं कोश तयार होते पकलेल्या कोशाला थोडेसाही हाल लागला की लगेच मोठ्या प्रमाणात बीजप्रसार होतो.
२. शेवळा :- शेवळा ही रानभाजी आहे उन्हाळ्यात मे महिन्यात डोंगराळ भागात झाडाझुडुपांमध्ये उगवते दोन महिने चालते जुलै महिन्यात शेवळं फुलुंन जातात त्याचा परीसरात दुर्गंधी वास पसरतो.
३. रानभेंड :- रानभेंड हे गावरान भेंडी सारखेच रान फुलं श्रावण महिन्यात डोंगराळ भागात माळरानावर बहरलेलं असंत फुलं गावरान भेंडी सारखीच असतात पान खरबाळी वाटतात. रान भेंडीचे मुळ केसतोडावर घासून लावल्याने सूज कमी होते.
४. कुंब्या :- हे रान फुलं श्रावण महिन्यात डोंगराळ भागात माळरानावर अगदी जमिनीलग फुलांनी बहरून गेलेलं असतं
५. रान मोगरा :- रान मोगरा हे रानफुलं श्रावण, भाद्रपद महिन्यात झाडाझुडुपांमध्ये फुलांनी बहरून गेलेलं असतं तोपर्यंत त्याचा सुगंध दरवळत राहतो
६. आर्किड :- आर्किड हे रानफुल श्रावण महिन्यात डोंगराळ भागात माळरानावर मोह किंवा बेहडा झाडाच्या मध्यभागी खोडावर आर्किडची छोटी वेल चिकटून गुलाबी रंगाने फुलांचा गजराच लोंबलेला आढळतो..
७.हेद : हेद हा रानातील पाणगळ वृक्ष आहे.त्याची उंची ९० ते १०० फुटांपर्यंत वाढते. उन्हाळ्यात एप्रिल, मे महिन्यात पुर्ण पाणगळ होते.श्रावण महिन्यात झाडावर झेंडु सारखी लहानली पिवळी गोंडस फुलं येतात. हा औषधी वृक्ष आहे. ही जंगली फुलं झाडं मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात रानात फुलांनी बहरून गेली आहेत.
८. कळलावी : कळलावी हे वेलवर्गीय रान फुल पावसाळ्यात डोंगराळ भागात उगवते श्रावण महिन्यात हे फुल या झाडाला अर्धवट पिवळी,पांढरी,लाल अशा रंगाची फुलं येतात निसर्गाच्या सानिध्यात शोभुन दिसतात
९. कोडई : पावसाळ्यात डोंगराळ भागात दऱ्याखोऱ्यात कडेकपारीत कोडई हे उन्हाळ्यात पाणगळीचे झाड पावसाळ्यात श्रावण महिन्यात पांढरे फुलांनी बहरून गेलेले असते या झाडाचे दोन प्रकार आहेत.काळी कोडई लहान पान असतात पानांचा चीक आयुवेर्दिक आहे केसतोड झालेल्या ठिकाणी लावला तर सुज कमी होते उंची दहा ते पंधरा फुट पांढरी कोडई उंच दोन फुटांपर्यंत असते या कोडईचा चीक शेळीच्या दुधात टाकल्यावर दुध घट्ट होते. खाल्यास घशातील खवखव कमी होते.
१०. साग : संपुर्ण वनस्पती सृष्टीत साग हा सोन्याप्रमाणे महत्त्वाचा वृक्ष मानला जातो सागचा सोना होणे ही आदिवासी भागातील म्हण आहे ह्याचे लाकुड लाकडी वस्तू बनवण्यासाठी वापरतात श्रावण महिन्यात साग वृक्ष फुलांनी सजविलेल्या फांदीवर बहरून गेलेला आहे अशी माहिती आदिवासी संशोधक सुभाष कामडी यांनी दिली आहे.

No comments