adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कै. ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापाणी, बिडगाव येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

 कै. ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापाणी, बिडगाव येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी  खलिल आर तडवी  बि...

 कै. ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापाणी, बिडगाव येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी 


खलिल आर तडवी  बिडगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बिडगांव (ता. चोपडा) येथील कै. ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एन. पाटील यांनी स्वीकारले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी विचार मांडले. एकूण २२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान गट व मोठ्या गटातील उत्कृष्ट वक्तृत्व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशपंढरी बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.


लहान गटातील विजेते:

1. हिंदवी अतुल पाटील

2. विजय भागवत पाटील

3. आलीया अरमान तडवी

मोठा गटातील विजेते:

1. हर्षदा भागवत पाटील

2. मुस्कान मुराद तडवी

3. आशिया अरमान तडवी  


या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सचिव व सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी बडगुजर यांनी केले.

No comments