अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षाला जातीवाचक शिवीगाळ विक्रम राठोड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर ...
अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षाला जातीवाचक शिवीगाळ विक्रम राठोड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना मात्र अहिल्यानगर शहरात जयंती मिरवणुकीत गालबोट लागल्याने समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील सर्जेपुरा येथील गुरुदत्त युवा प्रतिष्ठान मंडळाची मिरवणूक चितळेरोड येथे आली असता काही एक कारण नसताना विक्रम अनिल राठोड ( रा. नेतासुभाष चौक अहिल्यानगर) यांनी या मंडळाचे अध्यक्ष योगेश बाबासाहेब सोनवणे यांना तुमची लायकी आहे का असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आहे योगेश बाबासाहेब सोनवणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम अनिल राठोड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती (ॲट्रॉसिटी) अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments