adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युनानी उपचार पद्धती रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे - निसार मास्टर जिल्हा आयुष रुग्णालयात युनानी वैद्यकिय विभागात व्यसन मुक्ती कार्यक्रम उत्साहात

 युनानी उपचार पद्धती रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे - निसार मास्टर जिल्हा आयुष रुग्णालयात युनानी वैद्यकिय विभागात व्यसन मुक्ती कार्यक्रम उत्स...

 युनानी उपचार पद्धती रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे - निसार मास्टर

जिल्हा आयुष रुग्णालयात युनानी वैद्यकिय विभागात व्यसन मुक्ती कार्यक्रम उत्साहात 



श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सध्याच्या काळात भारतातील आरोग्यसेवा गरिबांसाठी अधिक सुलभ झाली आहे. मात्र आधुनिक उपचार पद्धतींच्या जोडीला पारंपरिक युनानी वैद्यकीय प्रणालीही एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. 

प्राचीन मध्ययुगीन परंपरेवर आधारित ही युनानी उपचार प्रणाली आजच्या रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे असे स्पष्ट मत अल्फा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, व्यसनमुक्ती चळवळीचे ज्येष्ठ प्रणेते व ज्येष्ठ पत्रकार निसार मास्टर यांनी व्यक्त केले.

जिल्हा आयुष रुग्णालय, अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निसार मास्टर यांनी सामाजिक आरोग्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, शरीरातील नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवणारी आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देणारी युनानी चिकित्सा प्रणाली ही केवळ रोग बरा करणारी नाही, तर जीवनशैलीतही सकारात्मक बदल घडवते. गरिबांना कमी खर्चात उत्तम उपचार मिळवून देणारी ही प्रणाली समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

या कार्यक्रमात डॉ. ईर्शाद मोमीन यांनी निसार मास्टर यांच्या सामाजिक कार्याचे आणि व्यसनमुक्तीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले. निसार मास्टर हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर नगर शहराचे खर्‍या अर्थाने भूषण आहेत, अशा शब्दांत त्यांनी गौरव व्यक्त केला. कार्यक्रमाला डॉ. नाजिया शेख, डॉ. मोहम्मद रेहान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास प्रा. डॉ. विजयकुमार पोटे (माध्यमतज्ज्ञ), पत्रकार प्रमोद कांबळे तसेच वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नाजिया मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले. जिल्हा आयुष रुग्णालय, अहिल्यानगर यांच्यातर्फे युनानी उपचार प्रणालीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार गुलामकादर

 जहागीरदार (जी.एम.) अ.नगर


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments