adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न

  फैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न    फैजपूर  (प्रतिनीधी  आदित्य गजरे ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...

 फैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न  


 फैजपूर  (प्रतिनीधी  आदित्य गजरे )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर (ता. रावेर) : फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी गणपती उत्सव तसेच ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची संयुक्त बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ तसेच मा. श्री. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महसूल, महावितरण, नगरपालिका विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, ध्वनीमर्यादा नियमांचे पालन करणे,मिरवणुकीदरम्यान शिस्त व नियमानुसार वर्तन करणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठक दुपारी 4:45 वाजता सुरू होऊन सायं. 6 वाजता समाधानपूर्वक संपन्न झाली

No comments