adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करण्याकरीता मागितली दीड लाखाची लाच कोतवालीच्या गोपनीय कर्मचाऱ्यासह खाजगी इसमावर गुन्हा दाखल

 गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करण्याकरीता मागितली दीड लाखाची लाच कोतवालीच्या गोपनीय कर्मचाऱ्यासह खाजगी इसमावर गुन्हा दाखल  सचिन...

 गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करण्याकरीता मागितली दीड लाखाची लाच कोतवालीच्या गोपनीय कर्मचाऱ्यासह खाजगी इसमावर गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

याप्रकरणातील तक्रारदार यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंद गांजाच्या केस मध्ये आरोपी न करता साक्षीदार करणेचे मोबदल्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे राजेंद्र प्रभाकर गर्गे, सहाय्यक फौजदार यांचे करिता मध्यस्थी खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांनी दिनांक २०/०८/२०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १,५०,०००/ लाख रुपये लाचेची मागणी केलेली आहे. सदर मागणीस सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाई दरम्यान स्पष्ट झालेले आहे. दिनांक २१/०८/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांना देणे करिता गेले असता, खाजगी इसम गायकवाड यांनी स्वतः तक्रारदार यांच्याकडून १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेली असून, हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तरी 1) मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, 2) मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती नेहा तुषार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,  व तपास अधिकारी श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर, तर सापळा व मदत पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी,चालक पोलीस हवालदार विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी काम पाहिले.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर तहसील कार्यालय सावेडी अहिल्यानगर

@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677

@ मोबा.क्रं. 8329701344

@ टोल फ्रि क्रं. 1064

==================

No comments