adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोल्ड मेडलिस्ट डॉ. यज्ञा लढे चा सत्कार

 गोल्ड मेडलिस्ट डॉ. यज्ञा लढे चा सत्कार  इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी ता यावल  येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध...

 गोल्ड मेडलिस्ट डॉ. यज्ञा लढे चा सत्कार 


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी ता यावल  येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे यांची कन्या व भारत विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी   कु. यज्ञा अनिल लढे  हिने डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून बी ए एम एस च्या अंतिम वर्षात प्रथम क्रमांक मिळवून डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. तसेच ती डी वाय पाटील विद्यापीठातून प्रथम आल्यामुळे गोल्ड मेडलची मानकरी  ठरली आहे.  परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे जोरावर तिने हे यश मिळवले असून ती न्हावी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे.

तिच्या यशाबद्दल तिचे आई-वडिल अनिल लढे,सौ.ललिता लढे व  डॉ. यज्ञ लढेचा  सत्कार  प्रा. एन टी तळेले, प्रा. आर वाय पाटील, प्रा. देवेंद्र पाचपांडे, प्रा. एल डी चौधरी, माजी मुख्याध्यापक युवराज वाघुळदे, माजी मुख्याध्यापक ललित कुमार फिरके, पोलीस पाटील संजय चौधरी यांनी सत्कार करून कौतुक केले.

No comments