खर्दे येथील सरपंच उपसरपंचा सह ग्रामस्थांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : सध्या कुठल...
खर्दे येथील सरपंच उपसरपंचा सह ग्रामस्थांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : सध्या कुठल्याही निवडणुका नसताना खर्दे येथील सरपंच उपसरपंच यांच्यासह चाळीस ते पन्नास ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. माननीय नामदार मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येथील नागरिकांनी भा.ज.पा. प्रवेश घेतला. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून मोठी इन्कमिंग ही भारतीय जनता पक्षात येताना दिसत आहे. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन डॉक्टर राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. खर्दे येथील सरपंच काशिनाथ अजबराव पाटील, योगेश अरुण पाटील उपसरपंच पीक संरक्षण संस्था चेअरमन, रूपचंद धुडकू पाटील, विशाल लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर लोटन वाघ, मनोज पंडित पाटील, साहेबराव हिलाल कोळी,गणेश नारायण पाटील गजानन देविदास भील,भाऊसाहेब युवराज मोरे, प्रमोद पुंडलिक पाटील गोपीचंद मुळा भील,रोहिदास आवसु कोळी, प्रमोद पुंडलिक पाटील, यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला या प्रसंगी धरणगाव तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, कन्हैया भाऊ रायमुलकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments