क.जे.सोमैया चा गणराज म्हसे हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात प्रथम श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अष्टपैलू संस्कृती कला अक...
क.जे.सोमैया चा गणराज म्हसे हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात प्रथम
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई या संस्थेच्या वतीने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कला व साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी १२ जुलै ते २४ जुलै २०२५ दरम्यान लोकमान्य टिळक जयंती निमित्त इ.१ ली ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर राज्यस्तरीय शालेय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत श्रीरामपूर येथील क.जे. सोमैया हायस्कूल चा विद्यार्थी चि.गणराज राजेंद्रकुमार म्हसे राज्यात प्रथम आला.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक,मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, जितेंद्र अग्रवाल, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे,अनिल चोभे, श्रीराम कुलकर्णी यांसह सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चि.गणराज चे अभिनंदन केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments