वाढीव आलेली विज बिले कमी करण्यासाठी अक्षय पाटील यांनी गाठले महावितरण कार्यालय....! जळगाव (जा.)प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव...
वाढीव आलेली विज बिले कमी करण्यासाठी अक्षय पाटील यांनी गाठले महावितरण कार्यालय....!
जळगाव (जा.)प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव (जा.) :- तालुक्यातील अनेक ग्राहकांना महावितरण कंपनीने अव्वाच्या-सव्वा बिले दिली सदर विज बिले ही रिडींगला धरून नसुन निव्वळ ग्राहकांची लुटमार असल्याचे दिसत आहे.वाढीव बिले कमी करावी यासाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयाकडे खुप वेळेस लेखी तक्रारी केल्या मात्र अधिकारी ऐकुन घ्यायच्या तयारीत नसल्याचे दिसुन येते.
त्यामुळे त्रस्त झालेल्या काही ग्राहकांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना सर्व विषय सांगितला असता त्यांनी तात्काळ महावितरण कार्यालय जळगाव जामोद चे उपकार्यकारी अभियंता चौबारावाला साहेब यांच्या कडे जाऊन आलेल्या सर्व समस्या सांगितल्या व सविस्तर चर्चा केली यासोबतच कार्यकारी अभियंता तायडे साहेब मलकापुर यांच्याशी सुद्धा दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर ज्या ग्राहकांनी महावितरण कडे तक्रारी केलेल्या आहेत त्यांची वाढीव विज बिले कमी केले नाही तर महावितरण कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज दिनांक २५/८/२०२५ ला उपकार्यकारी अभियंता यांना याप्रसंगी देण्यात आला.

No comments