स्वर्गीय. सौ. सांची सुदेश सावंत कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून होती ओळख...!! सौ. संगीता इंनकर ( रत्नागिरी जिल्हा ) प्रतिनिधी. (सं...
स्वर्गीय. सौ. सांची सुदेश सावंत कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून होती ओळख...!!
सौ. संगीता इंनकर ( रत्नागिरी जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात पती-पत्नी कुटुंब आणि मुलांचे शिक्षण पाहत हे पती-पत्नी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात कार्यरत होतं... आणि त्याच म्हणजे कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून ओळख असलेल्या सांची सुरेश सावंत (वय 38 ) यांचे 25 जुलै रोजी प्रसूतीदरम्यान अचानक त्यांना फिट आल्याने यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासह सावंत कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला. त्यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी समजताच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून चांगल्याच ओळखला जात होत्या. सांची सावंत यांचे पती देखील रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. या दाम्पत्याला दोन मुली होत्या सांची सावंत या तिसऱ्यावेळी गरोदर होत्या. त्यांना प्रसूतीसाठी कुटुंबियांनी रुग्णालय दाखल केले होते. याच दरम्यान त्यांना फिट आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमध्ये त्यांचे बाळही दगावले गेले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यांतील सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरंबी येथील हे सावंत कुटुंब होतं... सांची सावंत यांच्या जाण्यामुळे आज सावंत कुटुंबाच नव्हे तर त्यांची दोन लहाने मुली देखील आई-विना पोरकी झाली आहेत. अशा या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पोलीस हवालदार सांची सावंत यांना आज देवाघरी जावुन महिना पूर्णता झाला आहे. आदरणीय मॅडम जी. तुम्ही परत यावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपणांस जड अंतःकरणाने रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो...

No comments