adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आता मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा सीईओ कोण? नरवाडे,घुगे व संगीता महापात्रा यांच्यात जोरदार रस्सीखेच...!!

 आता मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा सीईओ कोण? नरवाडे,घुगे व संगीता महापात्रा यांच्यात जोरदार रस्सीखेच...!!   संभाजी पुरी गोसावी ( नाशिक जिल्हा...

 आता मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा सीईओ कोण? नरवाडे,घुगे व संगीता महापात्रा यांच्यात जोरदार रस्सीखेच...!! 


 संभाजी पुरी गोसावी ( नाशिक जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सध्या महायुती सरकारकडूंन पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला चांगलाच दिसून येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेसाठी आता अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाला महत्व प्राप्त झाले असून. येथील अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या पदासाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह अमरावती जिल्हा परिषदेच्या संगीता महापात्रा यांच्या नावाची चर्चा असून. या तिघांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे. या तिघांपैकी अधिकाऱ्यांकडून जोरदार फिंल्डिंग दिसून येत आहे. आशिमा मित्तल यांच्या बदलीनंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ.अर्जुन गुंडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. लवकरच नाशिकचा नवा सीईओ कोण? हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत.

No comments