adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालय अडावद च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती

  सार्वजनिक विद्यालय अडावद च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती  अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात शाडू ...

 सार्वजनिक विद्यालय अडावद च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती 

अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात शाडू पासून गणेशमूर्ती विद्यार्थ्यानी तयार केल्या विद्यार्थी व शिक्षक व शिक्षिका आदी मान्यवर

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  अडावद    ता चोपडा  येथील सार्वजनिक विद्यालय येथे मुख्याध्यापक  अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सारिका चरडे, श्रीमती शुभांगी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रथम दिवशी गणपतीच्या आकर्षक मूर्ती विद्यालयातील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या व दुसऱ्या दिवशी मूर्तीचे रंगकाम व सजावट करण्यात आली.यात उपशिक्षक  सचिन पाटील   नितीन महाजन , सौ नलिनी पाटील,श्रीमती ज्योती पाटील, श्रीमती सपना कोळी यांनी सहभाग घेतला. यावेळी इयत्ता 6 वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आकर्षक  मूर्ती तयार केल्या   यावेळी मुख्याध्यापक अशोक कदम    व सचीन पाटील व सौ नलीनी पाटील यांनी  विद्यार्थ्यांना गणपती कसे बनवितात  या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले   यावेळी सर्व शिक्षक व शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते  

No comments