adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींना ४ लाख रुपये नुकसान भरपाई मीळण्याचे दि. ९/३/२०१६ चे परिपत्रक क्रमांक ५३३ ची माहिती महाराष्ट्रातिल म. राज्य विज वितरण कंपनीच्या सर्व कार्यालयात नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात फलक लावण्यात यावे ---माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांची महावितरण व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे मागणी

 विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींना ४ लाख रुपये नुकसान भरपाई मीळण्याचे दि. ९/३/२०१६ चे परिपत्रक क्रमांक ५३३ ची माहिती महाराष्ट्रा...

 विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींना ४ लाख रुपये नुकसान भरपाई मीळण्याचे दि. ९/३/२०१६ चे परिपत्रक क्रमांक ५३३ ची माहिती महाराष्ट्रातिल म. राज्य विज वितरण कंपनीच्या सर्व कार्यालयात नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात फलक लावण्यात यावे ---माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांची महावितरण व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे मागणी 

जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

     सध्या महाराष्ट्रात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना खूप घडत आहेत. यामध्ये अनेकदा काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अथवा नैसर्गिक पडझडी मुळे निरपराध व्यक्तींचा मृत्यू होतो. अशा व्यक्तींच्या कुटुंबियांची कधीही भरून न येणारी हानी होत असते. अशा वेळी त्या मृत व्यक्ती च्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई तरी मिळणे आवश्य असते.  महावितरण कंपनीच्या  संचालक मंडळाने १२/१/२०१६च्या ठराव क्रमांक २९० व्दारे नागरिकांना होणाऱ्या जीवघेण्या अपघातासाठीची आर्थिक मदत दोन लाख रुपयावरुन ४००००० रुपये करण्याची मान्यता दिली आहे. तशा आशयाचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५३३ दि. ९/३/२०१६ रोजी महाव्यवस्थापकांनी प्रसारित केले आहे. मात्र दुर्दैवाने नागरीकांना सोडाच पण महावितरणच्या अनेक अधिकाऱ्यांनाही हे परीपत्रक माहीत नाही. याचा परीणाम म्हणजे आपला जिवाभावाचा माणूस हकनाक गमावलेल्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून पळापळी करावी लागते आणि अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात आणि मिळेल ती थातूरमातूर नुकसानभरपाई घेऊन गप्प बसावे लागते.या बाबतची तक्रार श्री भगवान चौधरी यांनी महावितरण कंपनी कडे सदर परीपत्रक महाराष्ट्रामधील  सर्व कार्यालयांमध्ये ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने प्रसिद्ध करावे आणि अधिकाऱ्यांना विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना या परीपत्रकाप्रमाणे विनाविलंब नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी श्री चौधरी यांनी ईमेल व्दारे व्यवस्थापकीय संचालक, प्रकाश गड यांच्या कडे ईमेल व्दारे केली आहे.

No comments