न्हावी गावातील मुख्य रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी गावातील मुख...
न्हावी गावातील मुख्य रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी गावातील मुख्य रस्त्याचे सपाटी करण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात कच टाकून कै. रमेश हिरामण फिरके यांच्या घरापासून तर स्वामिनारायण मंदिरापर्यंत पूर्णत्वास गेले आहे. वास्तविक हे काम जलजीवन मिशन अंतर्गत अनुपम कंट्रक्शन या कंपनीचे आहे. मात्र संबंधित कंपनीने वेळेत काम न केल्यामुळे गणेशोत्सव व दुर्गोत्सव डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाने स्वखर्चाने हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करीत आहे.अशी माहिती सरपंच देवेंद्र चोपडे ,उपसरपंच चेतन इंगळे व ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.
No comments