न्हावी शिवारात २ लाखांच्या गांजासह दोघांना अटक ; पोलीस प्रशासनाची मोठी कार्यवाही इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव ज...
न्हावी शिवारात २ लाखांच्या गांजासह दोघांना अटक ; पोलीस प्रशासनाची मोठी कार्यवाही
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान फैजपूर उपविभागात स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली. या कारवाईत ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारमूल्य रु. १,९४,३४०/- इतकी आहे. विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि.२८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ. प्रविण भालेराव, पोहेकॉ. मुरलीधर धनगर, पोकॉ. सिद्धेश्वर डापकर, पोकॉ. गोपाल पाटील, चा. पोकॉ. महेश सोमवंशी हे शासकीय वाहनाद्वारे फैजपूर उपविभागात गस्त घालीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्हावी गावाजवळील शेतातील एका पत्र्याच्या घरात काही व्यक्ती गांजा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत. त्फयानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील (स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव) यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार, संपूर्ण पथकासह फैजपूर पोलीस ठाणे गाठण्यात आले. प्रभारी अधिकारी सपोनि. रामेश्वर मोताळे, तसेच यावल पो.स्टे.चे पोनि. रंगनाथ धारबळे यांच्या उपस्थितीत आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून छापेमारी करण्यात आली.
No comments