पुण्यातील जातीयवादी पोलिसांविरोधात ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा; भीम आर्मीची राज्यपालांकडे मागणी. लातूर जि.प्र.(उत्तम माने) (संपादक -:- ह...
पुण्यातील जातीयवादी पोलिसांविरोधात ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा; भीम आर्मीची राज्यपालांकडे मागणी.
लातूर जि.प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुण्यातील मुलींना जातीयवाचक शिवीगाळ,मारहाण,लैंगिक,मानसिक छळ करणाऱ्या पोलिसांवर ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृषणन यांच्याकडे देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनत असे म्हटले आहे की,फुले,
शाहू,आंबेडकरी विचारांचा वारसा चालवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात पुणे शहरातील कोथरूड भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून छत्रपतीसंभाजी नगर येथील एक ओबीसी विवाहीत महिला सासरच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या अन्यायग्रस्त महिलेला येथील कोथरूड भागात राहणाऱ्या दोन बौद्ध व एका मातंग तरुणींनी आश्रय दिल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्या तरुणींना पोलीस ठाण्यात आणून जातीयवाचक शिवीगाळ करून सतत ०४ तास मारहान, लैंगिक,
मानसिक छळ करण्यात आला अश्या जातीयवादी,अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांवर ऑस्ट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोषी पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे.
अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून संबंध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आहे की, आपण महाराष्ट्राचे राज्यपाल या नात्याने महाराष्ट्र सरकारला सदरील प्रकरणी आदेश देऊन संबंधिता विरोधात ऑट्रोसिटी व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे, राज लोखंडे ,किशोर सुरवसे, अनिल सुरवसे, दिगंबर सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, प्रथमेश सूर्यवंशी,अनिल कांबळे, निखिल कांबळे, अर्जुन जाधव, मनोज कांबळे, बालाजी सुरवसे,अक्षय ससाणे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments