adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक वर्षापासून वडूज पोलीस ठाणेतील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या उंब्रज पोलिसांनी आवळल्या मुसक्या...!! उंब्रज पोलिसांची कामगिरी !

 एक वर्षापासून वडूज पोलीस ठाणेतील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या उंब्रज पोलिसांनी आवळल्या मुसक्या...!! उंब्रज पोलिसांची कामगिरी !   सौ...

 एक वर्षापासून वडूज पोलीस ठाणेतील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या उंब्रज पोलिसांनी आवळल्या मुसक्या...!! उंब्रज पोलिसांची कामगिरी ! 


 सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 वडूज पोलीस ठाण्यात एक वर्षापासून दाखल असलेल्या  खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या उंब्रज पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. उंब्रज पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस हवालदार नंदकुमार निकम पोलिस अमलदार प्रफुल पोतेकर हे आपल्या खाजगी वाहनाने तारळे दूरक्षेत्र परिसरांत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली की वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 233/2024 भा. द. वि. कलम प्रमाणे.302, 34 मधील फरार आरोपी नामे सुरज संपत साळुंखे (वय 29) रा. नागठाणे ता. जि. सातारा ) हा तारळे जंगलवाडी रोड वरती उभा असल्याचे समजले असता. सदर बाब पोलीस उपनिरीक्षक खबाले यांनी उंब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना कळवून ते खात्री करणे कामी वेशांतर करून सदर ठिकाणी गेले असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी त्या ठिकाणाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला तेव्हा पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले हवालदार निकम पोलिस अंमलदार पोतेकर यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्यांचे नाव वरील प्रमाणे असल्याचे सांगितले आहे. सदर बाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून सदर आरोपींस  सुरज साळुंखे यांस वडूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आरोपी सुरज साळुंखे यांस पुढील कारवाईसाठी वडूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे  पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस हवालदार नंदकुमार निकम पोलीस अंमलदार प्रफुल्ल पोतेकर होमगार्ड अक्षय जरग आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. उंब्रज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.

No comments