adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिंगोणा रस्त्यावरील चिखल हा जेसीबीच्या साह्याने तात्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची मागणी लासूर गावा बाहेरील हिंगोणा रस्त्यावर लासूर बायपास रस्त्यावर झाला चिखल

 हिंगोणा रस्त्यावरील चिखल हा जेसीबीच्या साह्याने तात्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची मागणी लासूर गावा बाहेरील हिंगोणा रस्त्यावर लासूर ब...

 हिंगोणा रस्त्यावरील चिखल हा जेसीबीच्या साह्याने तात्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची मागणी

लासूर गावा बाहेरील हिंगोणा रस्त्यावर लासूर बायपास रस्त्यावर झाला चिखल  


चोपडा प्रतिनिधी:- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील लासूर-हातेड रस्ता हा छत्रपती संभाजी नगर ते इंदौर (मध्य प्रदेश) असा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. 

मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याकारणाने त्या महामार्गावर जे मटेरियल लागत आहे. ते बाहेरून डंपर च्या साह्याने आणले जात आहे. म्हणून तात्पुरता स्वरूपाचा लासूर गावाच्या बाहेरून रस्ता काढण्यात आला आहे. 

लासूर गावाच्या बाहेर हिंगोणा रस्त्यावर लासूर बायपास रस्त्यावर जो चिखल झाला आहे. त्या चिखलातून वाट काढणे मुश्किल झाले आहे. म्हणून पायदळ चालणारे नागरिक, मोटार सायकल वरून चालणारे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून याला जबाबदार कोण? 

या महामार्गाचे ठेकेदारांना हि समस्या दिसत नाही का? जे डंपर या महामार्गावरून वाहतूक करत आहेत. त्यांनी लासूर गावाच्या बाहेरील मराठे गावाच्या रस्त्याची सुध्दा पुर्णतः वाट (खराब) लावली आहे. लासूर गावातील नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून जे कोणी ठेकेदार असतील त्यांनी तात्काळ हिंगोणा रस्त्यावरील चिखल हा जेसीबीच्या साह्याने बाजूला करून वाट मोकळी करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments