adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोर्शी हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड ; धाडीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त

 मोर्शी हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड ; धाडीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त  मोर्शी / प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पेट्रोलिंगदरम्यान पोल...

 मोर्शी हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड ; धाडीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त 

मोर्शी / प्रतिनिधी 


(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी मोर्शी (जि.अमरावती) हद्दीतील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून अंदाजे २० लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

२४ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, प्रशांत वाघमारे यांच्या शेतातील - घरात जुगार सुरू आहे, या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून प्रशांत सुभाष वाघमारे (४०), प्रफुल्ल प्रकाश दारोकार (३२), जितेंद्र बाळासाहेब सदाफळे (४२), अमोल रामदास वाघमारे (४०), शहीद खाँ छोटे खाँ (५५), जितेंद्र प्रकाश डेहनकर (३६) अंकुश राजेंद्र दारोकार (३३), शेख सलीम शेख इस्माईल (४२), मंगेश प्रल्हाद सदाफळे (४०), आशीष जानराव कोरडे (४७), सौरभ प्रल्हाद गहुकर (३४), महादेव सिताराम पानसे (४५) सर्व रा.हिवरखेड, विलास सुभाष मालवे (४२) रा. टेंभुरखेडा वरूड, धनराज केदारनाथ टिकस (४८) रा. लक्ष्मीनगर वरूड, धर्मेंद्र एकनाथ गोंडाणे (४९) रा. रिंगरोड वरूड, किशोर मोतीराम भगत (५२) रा. रिंगरोड वरूड यांना ताब्यात घेण्यात आले, तर ऋषिकेश वैराळे .रा. हिवरखेड हा फरार आहे. यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी २ लाख ४२ हजार ६५० रुपये, जुगाराचे साहित्य किंमत ७०० रु, १७ मोबाईल १ लाख ७० हजार रुपये व दोन दुचाकी किंमत १ लाख ४० हजार रूपये तसेच हुन्डाई कार किंमत अंदाजे १५ लाख रूपये असा एकूण २० लाख ५३ हजार ३५० रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोलिस अंमलदार बळवंत दाभणे, रवींद्र बावणे, पंकज फाटे, चालंक पोकॉ प्रशिक वानखडे यांच्या पथकाने पार पाडली.


वृत्त विशेष सहयोग

पत्रकार प्रविण सावरकर

 (वरुड जि.अमरावती)


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments