आनंदोत्सव वाटवा असा गणेशोत्सव साजरा करावा - डिवायएसपी अनिल बडगुजर रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गणेशोत्सव ...
आनंदोत्सव वाटवा असा गणेशोत्सव साजरा करावा - डिवायएसपी अनिल बडगुजर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गणेशोत्सव साजरा करतांना सर्व समाज बांधवांच्या एकत्रित सहभागाने एकोप्याने मोठ्या आनंदाने एकता एकात्मता व भाईचार जातिय सलोखा अबाधित राखून गणेशोत्सव म्हणजेच आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे वाटायला हवा असे आवाहन फैजपूर/प्रभारी मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी डिवाय एसपी यांनी सावदा पोलीस स्टेशनचे वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले
सावदा येथील जेहरा मेरेज हॉल मध्ये शांतता समितीच्या बैठकीत फैजपूर/मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी डि वाय एस पी श्री अनिल बडगुजर मुख्याधिकारी भुषण वर्मा रावेर तहसील चे नायब तहसीलदार आर.डी.पाटील विद्युत.महाविरणचे अभियंता गणेश महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाविस्कर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे उपनिरीक्षक राहुल सानप सी आर जाफर हुसेन आदि उपस्थित होते
यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी
सण उत्सव असा साजरा की सर्व समाज बांधवांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करावा कोणत्याही धर्माचा भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सण उत्सव साजरा करतांना सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले बैठकीत सावदा नगरपालिका माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी सैय्यद असगर डॉ प्रियदर्शिनी सरोदे,नंदाताई लोखंडे, सिमरन वानखेडे आदिंनी सर्व उपस्थित हिंदू मुस्लिम शांतता समिती सदस्य पंच कमिटी सरपंच पोलिस पाटील पत्रकार महीला दक्षता मंडळ पदाधिकारी बांधवांना हरतालिका गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या शुभेच्छा दिल्या सभेत उपस्थित गणेश मंडळ भक्तांनी मुस्लिम कमिटी च्या पदाधिकारी यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलाद एकोप्याने हर्षोल्लासात गुण्यागोविंदाने साजरा करण्याची ग्वाही दिली यावेळी सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मान्यवर उपस्थित होते तर बैठकीसाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे उपनिरीक्षक राहुल सानप पोहेकॉ निलेश बाविस्कर गोपनीय शाखेचे पो कॉ राहुल येवले पो कॉ राजेंद्र बोदडे पो कॉ मयुर पाटील फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे पो कॉ महेश मोगरे, गृहरक्षक दलाचे कर्मचारी सर्व दैनिकांचे पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते सुत्रसंचलन संजय महाजन सर यांनी केले तर आभार उपनिरीक्षक अमोल.एन.गर्जे यांनी मानले



No comments