📰 “पंढरपूर वारी लय भारी” थीमवर मुख्याधिकाऱ्यांचा वैयक्तिक गणपती : पर्यावरणपूरकतेचा अनोखा संदेश चोपडा (प्रतिनिधी) : (संपादक -:- हेमकांत गा...
📰 “पंढरपूर वारी लय भारी” थीमवर मुख्याधिकाऱ्यांचा वैयक्तिक गणपती : पर्यावरणपूरकतेचा अनोखा संदेश
चोपडा (प्रतिनिधी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगरपरिषद चोपडा येथील मुख्याधिकारी यांनी यंदा आपल्या वैयक्तिक गणपतीत “पंढरपूर वारी लय भारी” ही आगळीवेगळी थीम साकारली आहे. पारंपरिक भक्तीभावासोबत पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम या देखाव्यातून साकारण्यात आला आहे.
गणपती सायकलवर बसून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाताना दाखविले आहेत. मागे विठ्ठलाची मूर्ती असून रस्त्याच्या कडेला पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे बॅनर्स लावलेले आहेत. गणपती पंढरपूरला पोहोचल्याचे दृश्य विशेष आकर्षण ठरत आहे.
या थीमला प्रेरणा मुख्याधिकाऱ्यांच्या स्वतःच्या ४८५ किमी सायकलवारी अनुभवातून मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी चोपडा सायकल ग्रुपसोबत पंढरपूर सायकलवारी केली होती. त्या अनुभवाचे सुंदर चित्रण यंदाच्या गणेशोत्सवात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हा देखावा मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः केवळ एका रात्रीत तब्बल ११ तास खर्च करून उभारला आहे. संपूर्ण मूर्ती शाडूच्या मातीची असून, सजावटीसाठीही पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.शहरभर या वैयक्तिक गणपतीची मोठी चर्चा सुरू असून, “भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण” या त्रिसूत्रीचा सुंदर संदेश या देखाव्यातून मिळतो आहे.

No comments