दुसखेडा गावात दोन वर्षापासून पाण्याची समस्या : प्रशासनाचे दुर्लक्ष समस्यां न सुटल्यास उपोषणाच्या इशारा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक...
दुसखेडा गावात दोन वर्षापासून पाण्याची समस्या : प्रशासनाचे दुर्लक्ष
समस्यां न सुटल्यास उपोषणाच्या इशारा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावलः यावल तालुक्यातील दुसखेडा येथे पिण्याच्या पाण्यांची समस्यां गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पाणीच्या पाण्याची समस्या येत्या आठ दिवसात सोडवा अन्यथा पंधरा ऑगस्ट पासुन यावल पंचायत समिती जवळ उपोषणाचा इशारा ग्राम पंचायत सदस्यं महेंद्र बान्हे यांनी दिला आहे
ग्राम पंचायत सदस्यं महेंद्र गंगाराम बान्हे यांनी यावल पंचायत समीती गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे
दुसखेडा या गावात गेल्या २ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई सुरु आहे. गावाजवळ तापीनदीचा प्रवाह असुन आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची खुप अडचण येत आहे. वारंवार तक्रारी केल्या ग्राम सचिवांना सुद्धा वारंवार तक्रारी केल्या. परंतु प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. काही दिवस मित्र गाव यांच्याकडून पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु ते सुद्धा बंद पडलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे खुप हाल होत आहेत. गावात सांडपाणी भरपूर आहे परंतु पिण्या योग्य नाही. ग्रामस्थांना ६ किलोमीटर अंतरावरून शेजारच्या गावातून किंवा भुसावळ येथून विकत पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. परंतु गोरगरीब जनता विकत पाणी कुठून आणेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
दुसखेडा गावाची व गोरगरीब जनतेची कीव प्रशासनाने ८ दिवसात समस्यां सोडवा असे निवेदनात म्हटले आहे
पाण्याची समस्या आठ दिवसात नसुटल्यास पंचायत समिती यावल येथे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी मला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये म्हणून आमच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी निवेदना व्दारे करण्यात आली आहे.

No comments