व्हाट्सअप ग्रुप मार्फत मिळणार शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती मोठा वाघोदा येथील महसूल तर्फे तलाठी मधुराज पाटील यांनी बनविला शेतकरी बांधव...
व्हाट्सअप ग्रुप मार्फत मिळणार शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती
मोठा वाघोदा येथील महसूल तर्फे तलाठी मधुराज पाटील यांनी बनविला शेतकरी बांधवांचा व्हाट्सअप ग्रुप
शेतकरी बांधवांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना उपक्रम तसेच शेतसारा महसूल कर भरणाण्यासाठी तातडीने अवगत होणे कामी होईल मदत
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बुद्रुक येथील तलाठी मधुराज पाटील यांचा शेतकरी बांधवांसाठी ईपिक पाहणी व नोंदणी शेतकरी ओळख पत्र फार्मर आयडीसह विविध योजनांची शेतकरी बांधवांना तातडीने व सहजपणे शासकीय योजनांची माहिती होणे साठी मोठा वाघोदा बु येथील नव्यानेच रुजू पदभार स्वीकारलेले तलाठी मधुराज पाटील यांनी शेतकरी बांधवांना कार्यालयीन कामकाज सुलभतेने उपलब्ध व्हावे व शेतकरी बांधवांना व नागरिकांना तलाठी सजा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये या उद्देशाने एक
स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरुवात केली तलाठी मधुराज पाटील यांनी गावातील सर्व शेतकरी खातेदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी सदस्य लोकसेवक सामाजिक कार्यकर्ते आदिंचा समावेशक व्हाट्सअप ग्रुप बनविला जेणेकरून शासनाच्या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या योजना उपक्रमांची माहिती तातडीने व सहजपणे प्राप्त होऊन प्रचार प्रसार प्रबोधन करण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच शेतकरी बांधवांना शेतसारा महसूल कर भरणा करणे काळासोबत च ईपीक पाहणी नोंदणी करणे शेतकरी ओळख पत्र फार्मर आयडीसह शैक्षणिक तसेच नागरिकांना उपयुक्त व सोयीचे ठरणार आहे तलाठी मधुराज पाटील यांच्या या उपक्रमाला गावकर्यांनी प्रतिसाद देत त्यांच्या या उपक्रम व स्तुत्य कार्याचे कौतुक केले आहे या उपक्रमाला राबविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बी.ए.कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे नायब तहसीलदार आर.डी पाटील मंडळाधिकारी अमोल चौधरीसह महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आदींनी मार्गदर्शन केले

No comments