पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या :- अधिकाऱ्यांनी तात्काळ रुजू व्हा:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..!! परभणी,वाशिम अकोला,वर्धा जिल्हाधिकारी बद...
पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या :- अधिकाऱ्यांनी तात्काळ रुजू व्हा:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..!! परभणी,वाशिम अकोला,वर्धा जिल्हाधिकारी बदलले.!
सौ. संगीता इनकर ( मुंबई ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यांतील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही महिन्यांत सातत्याने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असूनही आताही गेल्याच आठवड्यात 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी सायंकाळी राज्य सरकारकडूंन पाच ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये परभणी,अकोला वाशिम या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी बदलले आहेत. यामध्ये बदल्या झालेले ( आयएएस अधिकारी पुढील प्रमाणे ) संजय चव्हाण ( IAS:SCS:२०११) अतिरिक्त नियंत्रक, मुद्रांक, मुंबई यांची परभणी येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रघुनाथ गावडे ( IAS:SCS:२०११) जिल्हाधिकारी, परभणी यांची मुंबई येथे अतिरिक्त नियंत्रक, मुद्रांक, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती बुवेनेश्वरी एस. ( IAS:RR:२०१५) जिल्हाधिकारी, वाशिम यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
योगेश कुंभेजकर ( IAS:RR:२०१६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांची वाशिम येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती वर्षा मीना ( IAS:RR:२०१८) यांची अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी रुजू हा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

No comments