मोठे वाघोदा येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील मोठ...
मोठे वाघोदा येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी असल्याने नाभिक समाजाच्या वतीने दि.२०/०८/२०२५ रोजी दुपारी 4 वाजता सत्यनारायणाची पूजा श्री ईश्वर निंबाळकर यांच्या हस्ते सपत्नीक करून मोठ्या हर्ष उल्हासात पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय जिवासेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री गणेश शेटी हे होते त्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले
या कार्यक्रमाला अखिल भारतीय जिवासेनेचे युवक जिल्हाध्यक्ष कुणाल गालफाडे,तालुका अध्यक्ष सुरेंद्र न्हावी,तालुका उपाध्यक्ष नितीन सोनवणे,सचिव राजेश सावळे,धनराज बोरनारे,प्रवीण सापकर,राजेश बोरनारे,युवराज सापकर,हेमंत चांदवे,प्रदीप अट्रावलकर,चेतन बोरनारे,सतीश महाजन,युवराज इंगळे,महेंद्र सापकर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. समाज टिकला तर धर्म टिकेल व धर्म टिकला तर राष्ट्र टिकणार म्हणून श्री संत सेना महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून आपण समाजकार्यासाठी पुढे यावे समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा असे आपल्या मनोगतात श्री नितीन सोनवणे यांनी सांगितले उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश शेटी यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीर शिवा काशिद संस्था वाघोदा व गावातील सर्व नाभिक समाज यांनी परिश्रम घेतले.


No comments