नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी घरासंबंधी काळजी घ्यावी - सपोनि विशाल पाटील मोठा वाघोदयात जनजागृती पर बैठक संपन्न रावेर प्रतिनिधी मुब...
नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी घरासंबंधी काळजी घ्यावी - सपोनि विशाल पाटील
मोठा वाघोदयात जनजागृती पर बैठक संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दैनंदिन चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी घरासंबंधी दक्षता काळजी घ्यावी बेजबाबदार पुणे किंवा निश्चित होऊन बाहेरगावी जातांना आवश्यक त्या उपाययोजना करुन काळजी घ्यावी असे आवाहन मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयातील आयोजित बैठकीत सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले त्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने तसेच जळगाव जिल्हा पोलीस विभागाने
जाहीर आवाहन करीत
सण उत्सवानिमित्त बाहेरगांवी गेल्या नंतर घरात चोरी होऊ नये म्हणुन घ्यावयाची दक्षता
१) घर कुलुपबंद करून बाहेरगावी जाताना शेजारी आपला पहारेकरी या म्हणी प्रमाणे आपल्या शेजाऱ्यास आपल्या कुलुपबंद परावर लक्ष ठेवण्या बाबत कळवावे.
२) घराच्या दरवाज्यास उच्च प्रतीचे कुलुप व कोंडा लावावे.
३) बाहेरून दिसणारे घरातील लाईट चालू स्थितीत ठेवावे.
४) शक्य असल्यास आपल्या घराच्या आवती भोवती चांगल्या प्रतीचे (नाईट व्हिजन) सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात यावे.
५) आपल्या गल्लीत काहीतरी विक्री करण्याचे उद्देशाने / अनओळखी इसम आल्यास त्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी, शक्य झाल्यास आपल्या मोबाईल मध्ये त्या इसमाचा फोटो काढुन घ्यावा व पोलिसांना अवगत करावे.
६) बाहेरगावी जाताना सबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कळवावे.
७) शक्य झाल्यास घरातील सोन्या, चांदीचे दागीने किंवा घरातील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरातील कपाटात न ठेवता बँकेमध्ये, लॉकरमध्ये ठेवावे. कारण चोरट्यांचे घरातील कपाट हे पहिले टार्गेट असते.
८) आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील लाईट रात्रीचे वेळी चालू स्थितीत राहतील याबाबत प्रयत्न करावे.
१) चोरी केल्यानंतर लवकरात लवकर गावाबाहेर पडता यावे या दृष्टीने गावातील किंवा शहराच्या कडेला असलेली घरे हि चोरट्यांचे टार्गेटवर असतात, त्यामुळे गावाच्या किंवा शहराच्या कडेला असणाऱ्या घरमालकानी जास्त काळजी घ्यावी.
१०) आपल्या गल्लीत किंवा गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करून आळीपाळीने आपल्या गल्लीत किंवा गावात रात्र गस्त ठेवावी.
११) शक्यतो आपल्या घरात सर्व मानसे बाहेरगावी न जाता एखादा व्यक्ती घरी राहिल या बाबत दक्षता घ्यावी.
१२) शक्य झाल्यास आपल्या गल्ली मध्ये / कॉलनी मध्ये रात्र गस्त साठी एखादा गोरखा / वॉचमन नेमावा.
१३) घरा मध्ये अँटीथेफ्ट अलार्म / सायरन सिस्टम बसून घ्यावी
१४) गल्ली मधील / कॉलनी मधील लोकांचा व्हॉटसअप ग्रुप तयार करून एकमेकांच्या संपर्कात राहावे.याप्रमाणे त्यांनी नागरिकांना काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन केले
यासोबतच जळगांव पोलीस दल आपल्या सेवेसाठी २४ तास तत्पर असल्याचे ही त्यांनी सांगितले
तसेच रात्री अपरात्री अनोळखी व्यक्ती किंवा काही संशयास्पद हालचाली दिसल्यावर तातडीने ९८५०४०४२८५४६१,९२८४१६१८८२ किंवा 112 नंबरवर संपर्क साधावा हा नंबर 24तास कार्यरत असल्याचे ही सावदा पोलीस स्टेशनचे
प्रभारी अधिकारी
सहाय्यक पोलीस निरीक्षक
श्री. विशाल पुंडलीक पाटील यांनी सांगितले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप,पोहेकॉ विनोद पाटील, गोपनीय शाखेचे पो कॉ मयुर पाटील बाळू महाजन विजय पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय माळी महेंद्र काळे माजी सरपंच मुबारक तडवी पोलीस पाटील गणेश भोसले बाळू काकडे अजय महाजन महेंद्र वाघ अलाउद्दीन तडवी पिंटू कापसे करन वाघ आदिसह गावातील नवयुवक तरुण जेष्ठ नागरिक उपस्थित होते


No comments