adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकणाऱ्या विद्यापीठाच्या "Carry On GR" रद्दबातल निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा निषेध!

विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकणाऱ्या विद्यापीठाच्या "Carry On GR" रद्दबातल निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा नि...

विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकणाऱ्या विद्यापीठाच्या "Carry On GR" रद्दबातल निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा निषेध! 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 22 जुलै 2025 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने परिपत्रक क्रमांक 47-2025 (GR) द्वारे "Carry On" धोरण जाहीर करण्यात आले होते. या निर्णयानुसार BE (2025-2026) अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना, त्यांच्या मागील वर्षांतील एक किंवा अधिक विषय अपूर्ण असतानाही, पुढील वर्गात (चौथ्या वर्षात) प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली होती.


SSBT College of Engineering and Technology,बांभोरी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या अधिकृत GR चा आधार घेत चौथ्या वर्षात प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे संपूर्ण शुल्क व परीक्षा शुल्कदेखील विद्यार्थ्यांनी वेळेवर भरले होते.

मात्र, दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठ प्रशासनाने अचानकपणे सदर GR रद्द करण्याचा निर्णय घेतला व याअंतर्गत घेतलेले प्रवेश अवैध ठरवले. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले.

हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कावर गदा आणणारा, मानसिक तणाव वाढवणारा व त्यांच्या भविष्यास गंभीरपणे बाधा पोहचवणारा आहे.

याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे कुलगुरू प्रो.डॉ.विजय माहेश्वरी सर यांना आज निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार (रावेर लोकसभा), अमोल पाटील (जिल्हा सचिव, मनशेसे रावेर लोकसभा), गायत्री पाटील, अभिषेक पाटील व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी खालील मागण्या करण्यात आल्या:

1. चौथ्या वर्षातील प्रवेश रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

2. विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश मान्य करून परीक्षा देण्याची परवानगी द्यावी.

3. GR संदर्भातील संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांसमोर सुस्पष्टपणे मांडावी.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या प्रशासनाच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कदापिही समर्थन देणार नाही. गरज भासल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

No comments