adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास पुष्पमाला पाच संपन्न

 चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास पुष्पमाला पाच संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)        चोपडा येथील पंच...

 चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास पुष्पमाला पाच संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

       चोपडा येथील पंचशील नगर येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षवास कार्यक्रम जिल्हाच्या व राज्याच्या नियोजनानुसार सुरू असून आज वर्षवास पुष्प माला क्रमांक पाच झाली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव गिरधर वाणे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चोपडा हे होते सदर वर्षवास मालिकेचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष सुदाम रामदास करंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

   आजच्या विषय बौद्धांचे पवित्र सण व मंगल दिवस या विषयावर प्रवचनकार वसंत बाबुराव शिंदे यांनी धम्म देसना दिली.यावेळी प्रा.डॉ.दिलीप सपकाळे व रमेश सोनवणे यांनी सुद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ यांनी केले.

       सदर कार्यक्रमास बापूराव वाणे, शालिकग्राम करंदीकर,सुदाम करंकाळ,संजय साळुंखे,जानकीराम सपकाळे, रामचंद्र आखाळे, रमेश सोनवणे,बाळा अहिरे, रविंद्र मगरे,बौध्द उपासक, उपासिका उपस्थित होते.

No comments