विदयार्थ्यांनी शिक्षणा सोबत संस्कार जपणे काळाची गरज: प्राचार्य नितीन काटे सर गायकवाड क्लास मध्ये इ. 5 वी ते 12 वी तील गुणवंत विदयार्थ्यां...
विदयार्थ्यांनी शिक्षणा सोबत संस्कार जपणे काळाची गरज: प्राचार्य नितीन काटे सर
गायकवाड क्लास मध्ये इ. 5 वी ते 12 वी तील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार
मुक्ताईनगर: शामसुंदर सोनवणे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील गायकवाड क्लास मध्ये गुणवंत मुला /मुलींचा सत्कार आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे एस.एम. कॉलेज चे प्राचार्य नितीन काटे सर,राहुल सोनवणे सर,डी. एस. काळे सर (वकील) अविनाश पाटील सर, प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
गायकवाड क्लास मधील इ. 5 वी ते 12 विच्या गुणवंत मुला मुलींना ट्रॉफी व बुके देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुण्यांनी मुला/ मुलींना अनमोल असे मार्गदर्शन केले.विद्यार्थी हा सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट असला पाहिजे व त्याने विद्यार्थी जीवनात खूप कष्ट घेतले पाहिजे असे मार्गदर्शन मुक्ताईनगर चे प्रसिद्ध वकील डी. एस. काळे सर यांनी केले
शिक्षणासोबत विदयार्थ्यांनी आपल्या संस्काराची जपणूक करणे अत्यावश्यक आहे आणि मोबाईल हाताळणे टाळले पाहिजे असे मार्गदर्शन एस.एम. कॉलेज प्राचार्य नितीन काटे सर यांनी केले. आपले यश हे आपल्यावरच आधारित असते आपण खूप अभ्यास करून ते मिळवावे असे अनमोल मार्गदर्शन राहुल सोनवणे सर यांना केले. शेवटी गायकवाड क्लास चे संचालक सतीश गायकवाड सर यांनी मुला मुलींना मार्गदर्शन करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.





No comments